आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसून‎ खेळाडूंचा जिल्हा म्हणून बीड पुढे यावे‎

गेवराई‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख‎ पुसून आता ग्रामीण भागातील‎ विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून बीडची ओळख‎ खेळाडूंचा जिल्हा म्हणून व्हावी. खेळाच्या‎ माध्यमातून नोकरी व्यवसायासह‎ खेळामध्ये सुध्दा करीअर करण्याच्या संधी‎ उपलब्ध आहेत. भविष्यात या क्रीडा‎ महोत्सवाचे स्वरुप वाढविण्यात येणार‎ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार‎ अमरसिंह पंडित यांनी केले.‎

जय भवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक‎ मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या‎ क्रीडा महोत्सव २०२२ चा पारितोषिक‎ वितरण समारंभ दिमाखदार सोहळ्यात‎ शुक्रवारी (ता.६ जानेवारी) जय भवानी‎ शैक्षणिक संकुल, शिवाजीनगर येथे पार‎ पडला. यावेळी व्यासपीठावर हॉकी‎ प्रशिक्षक प्रा.डॉ.सचिन देशमुख, राष्ट्रीय‎‎‎‎‎‎‎‎‎ कबड्डी खेळाडू वैभव गर्जे, महाराष्ट्र‎ संघाचे प्रशिक्षक प्रा.ब्रम्हनाथ मेंगडे,‎ राष्ट्रीय खेळाडू गोपाल मोटे, राष्ट्रीय‎ कबड्डी खेळाडू व प्रशिक्षक प्रा.डॉ.राणी‎ पवार, क्रीडा महोत्सवाचे आयोजक‎ रणवीर पंडित यांच्यासह मान्यवर‎ व्यासपीठावर उपस्थित होते.

रणवीर पंडित‎ म्हणाले की, ग्रामीण भागातील‎ विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन‎ देण्यासाठी या क्रीडा महोत्सवाचे‎ आयोजन करण्यात आले. दरवर्षी असे‎ क्रीडा महोत्सव आयोजित करून‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थ्यांच्या क्रीडा वाटचालीसाठी पोषक‎ वातावरण निर्माण केले जाईल. यावर्षी‎ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त‎ प्रतिसाद दिला. महोत्सवात आयोजित‎ केलेल्या खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल‎ आणि ॲथलेटीक्स स्पर्धेमध्ये विविध‎ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेळाचे‎ उत्कृष्ट प्रदर्शन केले. यातूनच चांगले‎ खेळाडू पुढे येतील आणि गेवराई‎ तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात‎ झळकवतील असा विश्वास त्यांनी‎ यावेळी व्यक्त केला.‎

या संघाना विजेतेपद‎ खो-खो स्पर्धेतील विजेेतेपद जय‎ भवानी विद्यालयाच्या संघास‎ विजेतेपद देण्यात आले.‎ पाचेगावच्या संघाला उपविजेतेपद‎ मिळाले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून‎ आश्विनी येवले हिचा सत्कार‎ करण्यात आला. व्हॉलीबॉल स्पर्धेत‎ माध्यमिक विद्यालय, तलवाडाच्या‎ संघाला विजेता पारितोषिक देऊन‎ गौरविण्यात आले. व्हॉलीबॉल‎ स्पर्धेत मुलाच्या वरिष्ठ गटात‎ शिवशारदा पब्लिक स्कुलच्या‎ संघाने प्रथम पारितोषिकाने सन्मान‎ करण्यात आला. कबड्डी स्पर्धेत‎ मुलीच्या गटामध्ये यमादेवी विद्यालय‎ जातेगावच्या संघाला विजेतेपद‎ मिळाले.‎

बातम्या आणखी आहेत...