आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील घटना:केवायसी अपडेटच्या बहाण्याने ‘एफडी’वर ऑनलाइन कर्ज काढून पाऊण लाखाचा गंडा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवृत्त व्यक्तीला पेन्शन बंद होण्याची भीती दाखवली

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन बंद होण्याची भीती दाखवत भामट्यांनी खात्याची सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या ‘एफडी’वर ऑनलाइन कर्ज काढून त्यातून ७५ हजार रुपये काढून घेतले. फसवणुकीची ही घटना बीड शहरात घडली.

एखाद्या व्यक्तीच्या एफडीवर परस्पर ऑनलाइन कर्ज काढून गंडा घालण्याचा प्रकार प्रथमच समोर आला आहे. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक भिकू रामराव उबाळे यांचे एसबीआय बँकेत पेन्शन खाते आहे. २२ जुलै रोजी दुपारी त्यांना केवायसी अपडेट करण्यासाठी मेसेज आला. त्यानंतर थोड्याच वेळाने एका भामट्याने उबाळे यांना कॉल केला. केवायसी अपडेट केले नाही तर बँक खाते आणि एटीएम बंद पडेल आणि पेन्शन जमा होणार नाही अशी भीती त्या भामट्याने घातली. त्यामुळे उबाळे यांनी आधार कार्ड नंबर, एटीएम नंबर, बँक खात्याची पूर्ण माहिती त्यांना दिली. त्यानंतर भामट्याने त्यांच्या खात्याला संलग्न असलेल्या एफडीवर तीन लाखांचे कर्ज घेतले व त्यातून ७४ हजार ९०० रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भिकू उबाळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात भामट्यावर बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...