आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारपर्यंत ५६ हजार ५०० कोरोना प्रतिबंधक लस आल्याने जिल्ह्यातील १४३ केंद्रावर गुरुवारी ४५ वर्षाच्या पुढील महिला व नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यात एकाच दिवशी ३२ हजार नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेऊन विक्रमी लसीकरण झाले. वडवणी तालुक्यातील तिन्ही केंद्रांवर लसीसाठी गर्दी उसळली हाेती. गेवराई तालुक्यात १८०० नागरिकांना दिली लस दिली गेली. केज येथील केंद्रावर नागरिकांनी कोरोनाचे नियम न पाळत गर्दी केल्याने येथे पोलिसांना पाचारण करावे लागले. धारूर शहरातील नगरेश्वर मंगल कार्यालयात १८ ते ४४ आणि ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना एकाच वेळी लसीसाठी बोलावल्याने एकच गर्दी उसळली. त्यामुळे पोलिसांना ही गर्दी कंट्रोल करता आली नाही. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत अाहेत. लस घेवून सुरक्षित होण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गुरुवारी मोठी गर्दी उसळली हाेती.
जिल्ह्यात मंगळवारी कोव्हिशिल्ड लसीचे ४४ हजार ५०० डोस आले होते. त्यानंतर कॉव्हॅक्सिनचे १२ हजार डोस आले. त्यामुळे लसीचा साठा ५६ हजार ५०० वर गेला. ४५ वर्षाच्या पुढील ज्या नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला होता. त्यांचा एक महिना पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रांवर गुरुवारी दुसऱ्या डोसचे नियोजन आरोग्य विभागाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेवून केले होते. डोस घेणाऱ्यांची वेटिंग लिस्ट तयार केली हाेती. एका केंद्रावर ३०० ते ५०० डोसचे नियोजन केले होते.
३२,१२३ जिल्ह्यातील एकूण लसीकरण
शहरातील केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचा बाेजवारा
बीड शहरात जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर बुधवारी पोलिस उपाधीक्षकांसह अन्य पोलिसांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने या केंद्रावर पोलिसांना साैम्य लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी या केंद्रावर लसीसाठी नागरिकांची कमी गर्दी दिसून आली. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे येथे लशीसाठी आलेल्या नागरिकांत फिजिकल डिस्टन्स दिसून आला नाही. तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातही सकाळी सहा वाजेपासून गर्दी उसळल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.