आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी उसळली; येळंब घाट येथे नेकनुर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

बीड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासुन कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला असुन कोरोना पासुन बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातही नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी उसळत आहे. बीड तालुक्यातील येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर बुधवारी सकाळी अकरा वाजता अचानक नागरिकांची गर्दी उसळल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. फिजीकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने रांगा करून शारिरिक अंतर ठेवण्यासाठी पोलिसांना नागरिकांवर सौम्य लाठीमार करावा लागला. बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासुन कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

बुधवारी आज सकाळी आरोग्य विभागाकडे केवळ 2,600 लसींचे डोस उपलब्ध होते. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा तेराशेवर जात असुन कोरोना पासुन बचाव करण्यासाठी लोक लसीकरण केंद्रात सध्या गर्दी करू लागले आहेत. बीड तालुक्यातील येळंब घाट येथील लसीकरण केंद्रावर सकाळ पासुनच नागरिकांनी गर्दी करायला सुरूवात केली.

या लसीकरण केंद्रावर दोनशे लसीचे डोस शिल्लक होते मात्र येथे पाचशे नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टनचा फज्जा उडून नागरिक थेट लसीकरण केंद्रात घुसल्याने या केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. सकाळी अकरा वाजता नेकनुर पेालिसांनी या केंद्रावर धाव घेवुन गर्दी करून कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर सौम्य लाठीमार केला. त्यांनतर शांततेत लसीकरण सुरू झाले. बुधवारी बीड जिल्हा रूग्णालय, येळंबघाट आणि बीड शहरातील अन्य एका केंद्रावर लसीकरण सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...