आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स व्हायरल

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबेजोगाईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स चांगलाच व्हायरल होतो आहे. यात महिला डॉक्टर गाण्याचा तालावर थिरकताना दिसत आहे. अंबेजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व स्टाफची चांगली तारांबळ उडाली.

यामुळे अनेक डॉक्टर आणि परिचारिकांना सलग 18-18 तास ड्युटी करावी लागली. मात्र आता अंबेजोगाईत रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. 10 दिवसापूर्वी अंबेजोगाई तालुक्यात दिवसाकाठी 250 पेक्षा अधिक रुग्ण आढळत होते, मात्र ती संख्या आता 50 हुन कमी झाली आहे. त्यामुळं या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतल्याच दिसतंय,

त्यामुळेच मागील महिना भरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टरांनी थेट पीपीई किट असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बातम्या आणखी आहेत...