आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:विभागीय वेटलिफ्टिंग‎ स्पर्धेत बीडची बाजी‎

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय‎ पुणे महाराष्ट्र राज्य यांच्याव्दारे‎ संचलित जिल्हा क्रीडा अधिकारी‎ कार्यालय बीड तथा जिल्हा क्रीडा‎ परिषद बीड व जिल्हा वेट लिफ्टिंग‎ असोसिएशन, यांच्या वतीने घेण्यात‎ आलेल्या औरंगाबाद विभागीय‎ शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत‎ बीडच्या खेळाडूंनी यश मिळवले‎ आहे.‎ या स्पर्धेत १७ वर्षे खालील मुली‎ गटात बीड येथील अलफीय जब्बार‎ शेख प्रथम, १७ वर्षे खालील मुले‎ गटात : जैद रशीद सय्यद, आदित्य‎ जगपति गायकवाड प्रथम, १९ वर्षे‎ खालील मुले गटात रितेश विष्णू शिंदे‎ प्रथम ठरला.

ही औरंगाबाद विभागीय‎ स्पर्धा बीड जिल्हा स्टेडियम येथील‎ जिम्नेशीयम हॉलवर पार पडली.‎ जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी‎ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली‎ तालुका क्रीडा अधिकारी गेवराई‎ एस.पी. चव्हाण, बीड तालुका क्रीडा‎ अधिकारी महेश खुटाले, उजवले,‎ राजेंद्र गायकवाड, प्रा.डॉ.भीमा माने‎ यांनी या स्पर्धा पार पाडल्या.‎ स्पर्धेसाठी सहकार्याबद्दल जिल्हा‎ वेटलिफ्टिंग असोसिएशनचे आभार‎ मानण्यात आले. यावेळी गुणवंत‎ खेळाडूंचा पालकांसोबत सत्कार‎ करण्यात आला. यासह हाजी शेख‎ शकील यांचा सन्मान पत्र देऊन‎ गौरविण्यात आला. राज्य स्पर्धेसाठी‎ या खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...