आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कसाबच्या सुरक्षेविषयीचे अनुभव लिहिण्याचे स्वप्न अधुरे, कोरोनामुळे बीडचे सहायक कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे निधन

अमोल मुळे | बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या कांबळे यांनी त्याचे अनेक बारकावे टिपले होते

बीडचे सहायक कारागृह अधीक्षक संजय कांबळे (४१) यांचे बुधवारी सकाळी कोरोनाने निधन झाले. कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या कांबळे यांनी त्याचे अनेक बारकावे टिपले होते. साहित्यप्रेमी असल्याने हे सगळे अनुभव शब्दबद्ध करून पुस्तक लिहिण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. मात्र, कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. गुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका सुधारकाची अकाली एक्झिट झाल्याने जिल्हा हळहळला.

कारागृहाच्या चार भिंतीत असलेला जेलर म्हणजे एकदम खडूस व्यक्ती ही प्रतिमा बदलणारे संजय कांबळे होते. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे संजय कांबळे हे डीएड आणि बीएड करून शिक्षण क्षेत्रात आले. शिक्षक म्हणून त्यांनी काही वर्षे नोकरी केली.

पुस्तकप्रेमी कांबळेंना साहित्य, संगीत, कला, वक्तृत्व यामध्ये त्यांना रुची होती. विद्यार्थ्यांचाही अशा प्रकारे व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे कमी काळात उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची तालुकाभर ओळख झाली. कांंबळे यांची पुढे स्पर्धा परीक्षेतून तुरुंगाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पैठण खुले कारागृह, मुंबई व इतर काही ठिकाणी त्यांनी कर्तव्य पार पाडले. मागील दीड ते दोन वर्षांपासून ते बीडमध्ये कार्यरत होते. कारागृहात विविध उपक्रम राबवले. सुरक्षा व्यवस्थेतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपैकी संजय कांबळे हे एक होते, त्यांनी कसाबचे अनेक पैलू टिपले होते. कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अनुभव मांडणारे पुस्तक लिखाणाचे त्यांचे स्वप्न होते, यासाठी त्यांनी लिखाणाला सुरुवातही केली होती.

चौथा योद्धा धारातीर्थी

कोरोनाच्या या लढाईत एक परिचारिका, दोन पाेलिस यांच्याबरोबर आता संजय कांबळेंच्या रुपाने चौथा योद्धा धारातीर्थी पडला आहे. दरम्यान, अद्याप एकाही व्यक्तीला शासनाकडून मिळणारी मदत मात्र मिळालेली नाही.