आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्‍कार्य:बीडच्या उदयोन्मुख गायिकेस पंकजा मुंडेंनी घेतले दत्तक, सोशल मीडियावर दिली माहिती

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडेंसोबत गायिका श्यामल. - Divya Marathi
पंकजा मुंडेंसोबत गायिका श्यामल.

मूळ बीड येथील श्यामल सौंदरमल या उदयोन्मुख गायिकेला एक उत्तम गुरू मिळेपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतले आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत माहिती दिली.

श्यामल सौंदरमल आणि तिचे कुटुंब सध्या मुंबईत राहत असून ते मूळचे बीड येथील आहेत. रोजीरोटी कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या या कुटुंबाचे कष्ट सुरू असतात. श्यामलची आई किशाबाई सौंदरमल यांचाही आवाज दैवी देणगी असून त्यांचा व्हिडिओदेखील यापूर्वी व्हायरल झाला होता. किशाबाई या दिव्यांग आहेत. पंकजा मुंडे आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारे काव्य किशाबाई यांनी लिहिले होते.

अत्यंत साधेपणाने घरात कणीक मळताना त्यांनी गायिलेले हे गाणे पंकजा मुंडे यांनीच सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर आता किशाबाई यांची मुलगी श्यामल हिचे ‘ऐ मेरे वतन के लोगों..’ हे गाणे पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट केले असून श्यामलला उत्तम गुरू लाभेपर्यंत आपण तिला दत्तक घेतोय, असेही त्यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...