आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्य बालनाट्य स्पर्धेत बीडचे ‘प्रायश्चित’ प्रथम, नागपूरचे थेंब थेंब श्वास द्वितीय, नगरचे मी तुझ्या जागी असते तर तृतीय नाशिक

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१८व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत युवा प्रबाेधन, बीड या संस्थेच्या प्रायश्चित्त या नाटकाला प्रथम पारिताेषिक जाहीर झाल्याची घाेषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सोमवारी (दि. १३) रात्री उशिरा केली. तर अश्वघाेष कला अकादमी, नागपूरच्या थेंब थेंब श्वास या नाटकास द्वितीय आणि सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर या संस्थेच्या मी तुझ्या जागी असते तर... या नाटकास तृतीय पारिताेषिक जाहीर झाले आहे. ६ जून ते ९ जून या कालावधीत सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे राज्य बालनाट्य स्पर्धेतील अंतीम फेरी पार पडली. यात २० प्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून पी. डी. कुलकर्णी, संजय हळदीकर, ज्ञानेश्वर गायकवाड, शुभांगी पाठक, सुरेंद्र वानखेडे यांनी काम पाहिले.

अभिनय राैप्यपदक : वेद दाकाेडे, (राखेतून उडाला मोर), वरद फेकडे (गुणांच्या सावल्या), शर्व दाते (जीर्णाेद्धार), हर्षदीप अहिरराव (तुला इंग्रजी येतं का?), कबीर आगे (प्रायश्चित), दीपांश मुरमाळे (थेंब थेंब श्वास), तेजस्विनी ठक्कर (कथा एका रात्रीची), मनुजा देशमुख (मी तुझ्या जागी असते तर), श्रद्धा वाघुंबरे (प्रायश्चित), सावनी दात्ये (भूत)

विविध प्रकारात घोषित करण्यात आलेले निकाल असे
- दिग्दर्शन : प्रथम - अशाेक घाेलप (प्रायश्चित), द्वितीय- रीशील ढाेबळे (थेंब थेंब श्वास), तृतीय - आरती अकाेलकर (मी तुझ्या जागी असते तर..) - प्रकाशयोजना : प्रथम - देवदत्त सिद्धाम (थेंब थेंब श्वास), द्वितीय - दीपक नांदगावकर (राखेतून उडाला मोर) - नेपथ्य : प्रथम- श्रेयस अतकर (थेंब थेंब श्वास), द्वितीय - नितीन धायगुडे (प्रायश्चित)
- रंगभूषा : प्रथम - उमेश कुलकर्णी (द पाॅवर गेम), द्वितीय - सुधा साळुंके (प्रायश्चित) - नाट्यलेखन : प्रथम - डाॅ. सतीश साळुंके (प्रायश्चित), द्वितीय - विरेंद्र गणवीर (थेंब थेंब श्वास) - संगीत : प्रथम - सुखदा भावे-दाबके (गाेष्टीची गाेष्ट), द्वितीय - ऐश्वर्या गलगले (कथा एका रात्रीची) - वेशभूषा : प्रथम- दीप्ती जाेशी (एका झाडाची गाेष्ट), द्वितीय- सुवर्णा काेळी (फार फ्राॅम द हाेम)

बातम्या आणखी आहेत...