आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने पोलीस ठाणे सिरसाळ्याच्या वतीने ग्रामस्थांची बैठक घेऊन आचार संहिता पालनाच्या सूचना देण्यात आल्या. यासह पथसंचलन करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात आले. सिरसाळा पोलिस ठाण्याच्या वतीने निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सिरसाळा, कवडगाव, आमला, निमला, गाडे पिंपळगाव, डिग्रज, बोधेगाव, पोळ पिंपरी, कावळेवाडी, पोहनेर या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
यासह आदर्श आचार संहिता पाळण्याच्या अनुषंगाने सिरसाळा येथे बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान दाखल एकूण १४७ इसमावर १०७ सीआरपीसीप्रमाणे प्रतिबंधित कारवाई करण्यात आलेली आहे. दारूबंदी तसेच जुगार प्रतिबंधक कायदे अंतर्गत अवैध धंद्यावर पूर्णपणे अटकाव केला गेला आहे. प्रभारी अधिकारी बीट अंमलदार यांच्या वतीने हद्दीतील १०७ बुथ तसेच ४५ मतदान केंद्रांना भेटी देण्यात आल्या. नाकाबंदीही करण्यासह गस्ती घातल्या जात असल्याचे पोलिस प्रशासनाने यावेळी सांगितले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने हजेरी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.