आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षिसे:बिहाइंड दी कर्टन ने पटकावली तीन बक्षिसे

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनाला तर्फे आयोजित ६१ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत परिवर्तन बीड तर्फे सादर करण्यात आलेल्या ‘बिहाइंड दी कर्टन’ या नाटकाने तीन बक्षिसे पटकावली असून नाटकाच्या नेपथ्याला प्रथम पुरस्कार मिळाला तर अभिनयासाठी डॉ सतीश साळुंके व उल्का कुलकर्णी यांनी बक्षीस पटकावली. औरंगाबाद व बीड केंद्र मिळून झालेल्या या स्पर्धेत बीडला ८ औरंगाबाद ते १७ नाटके झाली. या स्पर्धेत परिवर्तन बीड तर्फे सादर झालेले ‘बिहाइंड दी कर्टन’ या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ. सतीश साळुंके यांनी केले. नाटकात प्रा. सुधाकर विश्विमत्रेची भूमिका करणारे डॉ. सतीश साळुंके व माधवीची भूमिका करणाऱ्या उल्का कुलकर्णी यांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले तर नेपथ्यासाठी दिनेश पाटोळे यांना प्रथम पुरस्कार मिळाला. या नाटकाची प्रकाशयोजना अशोक घोलप यांनी संगीत प्रथमेश खडकीकर, वेशभूषा सुधा साळुंके यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...