आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील लोक सरळ आणि साध्या मनाचे आहेत. त्यामुळेच त्यांचे आणि बदामराव पंडित यांचे नाते घट्ट आहे. परंतु, गेवराईत राजे-महाराजे नावे लावून फिरणाऱ्यांच्या मागे सच्चे मावळे नसून केवळ डिजिटल मावळे आहेत. त्यामुळे त्यांचे वादळ कधीच तयार होत नाही. निवडणूक आली की, ते केवळ मतलबी वादळ निर्माण करतात, अशी टीका शिवसेना नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे ८ जून रोजी होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी गेवराईत पूर्वतयारी आढावा मेळावा झाला. याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या वेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, महिला आघाडी संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, जिल्हा समन्वयक माजी सभापती युद्धाजित पंडित, महिला आघाडी जिल्हा संघटक संगीताताई चव्हाण, युवासेना जिल्हा युवाअधिकारी सागर बहिर, किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, रोहित पंडित, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, माजी सभापती पंढरीनाथ लगड, शिवसेना तालुकाप्रमुख कालिदास नवले, उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे, शिवसेना महिला आघाडी संघटक अॅड. उज्वलाताई भोपळे, माजी तालुकाप्रमुख अजय दाभाडे, फरजाना शेख, बांगरताई, युवासेना तालुका युवा अधिकारी गोविंद दाभाडे, शहरप्रमुख शिनू बेदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, शिवसेना वाढीसाठी बदामराव पंडितांसह जिल्ह्यातले सर्व नेते काम करताहेत. परंतु हे करत असताना आपण सत्तेत आहोत. कार्यकर्त्यांना आर्थिक बळ मिळाले पाहिजे. यासाठी प्रस्तावित केलेली विकास कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच गेवराईत उसाचा प्रश्न गंभीर झालेला असताना गुलमेश्वर गूळ कारखान्याने शेतकऱ्यांना सांभाळले. अागामी काळात तीन ते चार गूळ उत्पादक कारखाने तयार होणार असल्याने गेवराईतल्या काटा मारणाऱ्या कारखान्याकडे शेतकऱ्यांना भविष्यात जावे लागणार नाही असे क्षीरसागर म्हणाले. तर माजी मंत्री बदामराव पंडित म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जूनला औरंगाबाद येथे विराट सभा होणार आहे. या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन केले.
सभेला सर्वाधिक शिवसैनिक हे बीड जिल्ह्यातलेच असतील जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जयदत्त क्षीरसागर व बदामराव पंडित सोबत असल्याने औरंगाबादच्या सभेला सर्वाधिक शिवसैनिक बीड जिल्ह्यातलेच असतील असा दावा केला. सूत्रसंचालन शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे यांनी, तर आभार तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी मानले. या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.