आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:बीड आगाराचे चालक बोराडेंना पुरस्कार; मंत्री अनिल परब यांच्या हस्ते 31 चालकांचा पुरस्कार देऊन केला गौरव

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटीमध्ये अपघाताविना सेवा देणारे राज्य परिवहन महामंडळाच्या बीड आगारातील चालक सखाराम बोराडे यांचा बुधवारी एसटीच्या ७४ व्या वर्धापनदिनी परिवहनमंत्री अनिल परब व एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

एसटीचा ७४ वा स्थापना दिन बुधवारी साजरा झाला. एसटी आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त पुणे ते अहमदनगर या मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण केले. पुणे येथे रंगशारदा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी राज्यात २५ वर्षे विनाअपघात सेवा देणाऱ्या ३१ चालकांचा परिवहनमंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते २५ हजारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. बीड आगारातील चालक सखाराम भानुदास बोराडे यांनीही २५ वर्षे विनाअपघात सेवा दिली असून त्यांना या कार्यक्रमात परब व चन्ने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराबद्दल बोराडेंचे बीडचे विभागीय नियंत्रक अजय मोरे, वाहतूक निरीक्षक पडवळ, बीड आगाराचे व्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...