आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद येथे झालेल्या एमकेसीएलच्या विभागीय मेळाव्यात केज शहरातील न्यू इंटेल कॉम्प्युटर्सला बीड जिल्ह्यातून ‘एमएस - सीआयटी’ व ‘क्लिक’ बेस्ट परफॉर्मिंग सेंटर हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
एमकेसीएलच्या व्यवस्थापिका वीणा कामत यांच्या हस्ते ‘न्यू इंटेल कॉम्प्युटर्स’चे संचालक गणेश सत्वधर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर न्यू इंटेल कॉम्प्युटर्सला २०१८ पासून सलग ४ वर्षे बेस्ट संचालकीय परफॉर्मिंग सेंटरचा पुरस्कार मिळालेला आहे. यावेळी रिजनल लिड सेंटरचे गजानन कुलथे, बालकिशन बालदवा, बीड एलएलसीचे हेड विठ्ठल पांचाळ हे उपस्थित होते. गणेश सत्वधर यांच्या या यशाबद्दल केज येथील नागरिक, विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.