आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सायबर क्राइमबाबत खबरदारी घ्यावी; युवतींसह महिलांनी स्टेट्स, प्रोफाइलबाबत राहावे सजग

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या अधुनिकीकरणात सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मुली आणि महिलांमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी मुले- मुली आणि पालकांनीही वेळीच योग्य खबरदारी घेतल्यास भविष्यात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.असे मत बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या शांता जाधवर यांनी येथे व्यक्त केले.

त्या योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी, कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आत्मभान शिबिरातील व्याख्यानात बोलत होत्या. मंचावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष एम.एस.लोमटे,छात्रसैनिक शितल औटी उपस्थित होते. पुढे बोलताना जाधवर म्हणाल्या की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून शाळा- महाविद्यालयांत प्रतिवर्षी अभियान राबविले जाते सायबर क्राईम वापरकर्त्यांसाठी ज्ञात आहे भविष्यातही या इंटरनेटचा गैरवापर होऊ शकतो तो रोखण्याची गरज आहे. युवती आणि महिलांनी स्टेट्स, प्रोफाईल या बाबतीत योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या.

छात्रसेनेतूनच देशसेवा करण्याची संधी : शीतल औटी
मुलींनी सातत्याने परिश्रम करावे. वैद्यकीय अभियांत्रिकीच्या मागे न लागता छात्रसेनेचा मार्ग निवडावा मनोबल वाढवण्यासाठी व शत्रूशी दोन हात करण्यासाठी मुलीं काही कमी नाहीत.छात्रसेनेमुळे मान, सन्मान,प्रतिष्ठा व आपल्या घराची प्रगती होते.

बातम्या आणखी आहेत...