आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगद नारायण महाराज:भगवानबाबा मूर्ती प्रतिष्ठपना सोहळा; सवाद्य मिरवणूक

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील बालेपीर भागातील पंडितनगर येथे संत नगद नारायण महाराज व संत भगवानबाबा महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास रविवारी प्रारंभ झाला. यानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालेपीर भागातील पंडितनगर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी, आई तुळजा भवानी, सिद्धी हनुमान, श्री गणेश, संत नगद नारायण महाराज, संत भगवानबाबा यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास रविवारी मिरवणूकीने प्रारंभ झाला. सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच नगर रोड भागात डॉ.सारिका योगेश क्षीरसागर, विलास विधाते, भाजप नेते अ‍ॅड.सर्जेराव तांदळे, अंबादास गुजर, राहुल गुजर यांनी पूजन केले. नगर रोड परिसरातील भाविकांनी ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचे स्वागत केले.

सोमवार (दि.४) रोजी रात्री ८ ते १० या वेळेत महंत राधाताई महाराज यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दि.६ रोजी महंत शिवाजी महाराज नारायणगडकर व महंत डॉ. न्या. नामदेव महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बंडुभाऊ शिंदे व पंडितनगर, भगवाननगर, वरद शिवनेरी रेसिडेन्सीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...