आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती पुरस्कार:भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार डॉ. यु. म. पठाण यांना जाहीर

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दिला जाणारा स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी औरंगाबाद येथील संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत व लेखक पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांना घोषित केल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.

डॉ. पठाण यांनी मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथे अध्यापनाचे कार्य केले आहे. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्रपाठक, अधिव्याख्याता व विभागप्रमुख म्हणूनही काम केले आहे. भारतातील व जगातील अनेक विद्यापीठांत त्यांनी संत साहित्यावर हजारो व्याख्याने दिलीत.

मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला व विद्यावाचस्पती ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. यापूर्वी हे पुरस्कार यशवंतराव गडाख, विजय कुवळेकर, ना. धो. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, प्राचार्य रा. रं. बोराडे व उल्हास पवार यांना प्रदान केलेला आहे. १९ सप्टेंबरला औरंगाबाद येथे हा पुरस्कार वितरित केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...