आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेबची कबर हैदराबादला हलवलीच पाहिजे:मी संजय शिरसाट यांना 'सपोर्ट' करतो! त्यांच्या मागणीला माझेही समर्थन

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार संजय शिरसाट यांनी औरंगजेबची कबर हैद्राराबादला हलवण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर ''मी संजय शिरसाट यांची टिव्हीवरील बाईट ऐकली. मी त्यांचे अभिनंदन करतो. मी त्यांचा सपोर्ट करतो, असे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी करून खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामाकरण करण्यात आल्यानंतर या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नैतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरू आहे. यावरुन आता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. या नावाला जेवढा विरोध इम्तियाज जलील करीत आहेत तेवढीच टीका त्यांच्यावर होत आहे. आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर तोफ डागल्यानंतर आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली.

औरंगजेब नावाला मुस्लिमांचा सपोर्ट नाही

भागवत कराड म्हणाले, ''माझे मुस्लिम बांधव कधीही औरंगजेबाला कधीही सपोर्ट करीत नाही. इम्तियाज जलील हे राजकारण करीत आहेत. इम्तियाज जलील आणि नामांतरावर लढा देणाऱ्याला विचारावे की, औरंगजेब नाव असलेले त्यांच्या घरात, नातेवाईकात किती लोक आहेत. मुस्लिम समाजाच्या भावनाही औरंगजेबच्या फेवरेबल नाही.''

त्यांचा शेवट बिहारच्या औरंगाबादेत होईल

भागवत कराड म्हणाले, ''इम्तियाज जलील यांचा शेवट बिहारच्या औरंगाबादेत होईल येथे कसा होईल आता नाव बदलले ना..! राजकारण आम्ही काहीही करीत नाही. अंबादास दानवे जो आरोप करीत आहेत ते चुकीचा आहे. आम्ही आमची सुरूवातीपासून मागणी छत्रपती संभाजीनगरची होती.''

इम्तियाज जलील राजकारण करीत आहेत

आमदार संजय शिरसाट यांनी औरंगजेबची कबर हैद्राराबादला हलवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावरूनही भागवत कराड म्हणाले, मी संजय शिरसाट यांचे अभिनंदन करत औरंगजेब कबरीबद्दल केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करतो. त्यांना असे म्हणायचे होते की, जे हैदराबादचे आहेत आणि येथे खासदार झाले त्यांना हैदराबादला परत पाठवावे. गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यानंतर त्याच्यावरून राजकारण करण्याचे कारस्थान केले जात आहे. मात्र अशा पद्धतीने करणे चुकीचे आहे.

बातम्या आणखी आहेत...