आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपघात:भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; पत्रकार शिराळेंचा मृत्यू

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चोरंबा शिवारात घडली. दिगंबर यशवंत शिराळे (२७, रा. चोरंबा) असे मृत पत्रकाराचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी शिराळे आपले काम आटोपून गावाकडे घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच ४४ वाय ३३७६) थेटेगव्हाण ते चोरंबादरम्यान अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्वाराती रुग्णालयात घेऊन जाताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी चोरंबा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धडक देणाऱ्या वाहनाचा शोध पोलिसांनी लावावा व कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांसह चोरांबा येथील नागरिकांकडून होत आहे. धारूर ते धुनकवड पाटी या अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून तत्काळ रस्ता रुंदीकरणाची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...