आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात एक जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अरणवाडी फाटा येथे घडली. आसाराम नागरगोजे (३८, रा. देवगाव) असे मृताचे नाव आहे. यातील जखमीस धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात हलवण्यात आले आहे .
तेलगावकडे भरधाव कार (एम एच२०, बी. एन ४२००) कार जात होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील अरणवाडी फाटा येथे चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन ही कार आदळली. कारमधील आसाराम नागरगोजे यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांना धारूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला, तर चालक बाळू मुरकुटे (२८, रा. देवगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धारूर रुग्णालयांत प्राथमिक उपचार करून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धाऊन आले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.