आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घडफोडी:गेवराई येथे भरदुपारी घडफोडी; 90 हजार रुपयांचा ऐवज लंपासगेवराई

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ताकडगाव रोडवरील सरस्वती काँलनी नंबर दोन येथे घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या कपाट व सुटकेस मधील नगदी ७० हजार व सोन्याचे दागिने असा जवळपास ९० हजारो रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

शहरातील ताकडगाव रोडवरील सरस्वती काॅलनी नंबर दोन येथे परमेश्वर कानगुडे वास्तव्यास आहेत.त्यांच्या पत्नी किस्किंदा यांचे रेडीमेड कापड दुकान आहे. शुक्रवारी त्यांनी कापड खरेदीसाठी बँकेतुन नगदी ७० हजार रुपये नगदी काढून आणून सुटकेस मध्ये ठेवले दरम्यान त्या दुकानात होत्या तर, पती कापूस घालण्यासाठी बाहेर व मुलगी हाॅस्पीटल मध्ये गेली होती. घराला कुलूप असताना चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी ७० हजार असा जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल घेउन अज्ञात चोरटे पसार झाले आहेत. मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

बातम्या आणखी आहेत...