आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:केज येथे कारच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

केज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना केज शहरातील सहारा रुग्णालयासमोर घडली. धडक देऊन कारसह चालक पसार झाला. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शहरातील खाजा नगर भागातील अझर अजीज शेख (३७) हे २० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कळंब येथून काम आटपून परत आले होते.

मांजरसुंबा रस्त्याने घराकडे जात असताना शहरातील सहारा रुग्णालयासमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या सिल्व्हर रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक अझर शेख हे दुचाकीवरून खाली पडून जखमी झाले. तर त्यांच्या कंबरेला व डोक्याला मार लागल्याने त्यांना अकबर शेख, मोबिन शेख या नातेवाईकांनी उपचारासाठी विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल केले. दुचाकीला धडक देऊन कार चालक न थांबता कारसह फरार झाला.

बातम्या आणखी आहेत...