आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदे रिक्त:आरक्षणासह बिंदुनामावली रखडली; जिल्ह्यात 945 पाेलिस पाटील पदे रिक्त

रवी उबाळे |बीड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यामध्ये एकूण महसुली एक हजार ४०२ गावांत राज्य शासनाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यासाठी एकूण १ हजार २४७ पाेलिस पाटील यांच्या पदांना मंजुरी आहेत. त्यापैकी सुमारे ९४५ पद हे भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली आहे. २०१३ मध्ये बीड आणि गेवराई तालुक्यातील पाेलिस पाटील पदभरती प्रक्रिया सुरू असताना उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल करण्यात आली. तीन वर्षाच्या कालावधी नंतर २०१६ न्यायालयाचे आदेश पारीत केला. त्यानंतर आजपर्यंत दाेन वर्षे काेराेनाचा काळ वगळा तर मागील चार वर्षांपासून गाव स्तरावरील आरक्षणासह बिंदुनामावलीचे कामची प्रक्रिया प्रशासनाकडून झाली नसल्याने ही पदभरती रखडल्याचे समाेर आले आहे.

परिणामी जिल्ह्यातील पाच उप विभागातील १ हजार ४०२ गावांचा कारभार बाेजा हा ३०२ पाेलिस पाटील यांच्यावर वाढला आहे.बीड जिल्ह्यात २०१३ मध्ये बीड व गेवराई तालुक्यातील पाेलिस पाटील पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी िजल्हा प्रशासनाने जाहिरात प्रकाशित केली हाेती. दरम्यान उच्च न्यायालय मुंबईच्या आैरंगाबाद खंडपीठ येथे रिट पिटीशन ६८१३/२०१३ व ६३६२/२०१३ याचिका दाखल करण्यात आल्या हाेत्या.

त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठ यांनी ११ आॅगस्ट २०१६ राेजी आदेश पारीत केले हाेते. आष्टी व शिरुर कासार तालुक्याचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने आष्टी तालुक्याचे कामकाज उप विभागीय अधिकारी पाटाेदा व शिरुर कासार तालुक्याचे कामकाज उपविभागीय अधिकारी बीड यांनी पहावे असे आदेश निर्गमित केले हाेते. त्यानंतर २०२२ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील रिक्त पाेलिस पाटील पादाच्या प्रश्नावर लक्षवेधी झाली. त्यावेळी गाव आरक्षणासह बिंदुनामावली ची कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने उत्तर दिले हाेते. ही प्रक्रिया अद्यापर्यंत पूर्ण झाली नाही.

पाेलिस पाटील यांची कामे
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी नियंत्रण ठेवणे, नैसर्गिक आपत्तीची तत्काळ माहिती यंत्रणेला कळवणे, गावस्तरावरील विविध घटना-दुर्घटनांची माहिती पाेलिस यंत्रणेसह महसूल यंत्रणेस तातडणीने कळवणे तसेच शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागास आहवाल पाठवणे.

सध्या जिल्ह्यात आचरसंहिता लागू
जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या निवडणुकींचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाेलिस पाटील पद भरती प्रक्रियेसंदर्भात विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. - संताेष राऊत, अपर जिल्हा दंडाधिकारी,बीड.

बातम्या आणखी आहेत...