आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:बिंदुसरा धरण यंदा प्रथमच 99 टक्के भरले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण यंदा प्रथमच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ९९ टक्के भरले. धरण परिसरातील वरील भागात माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास आता कोणत्याही क्षणी प्रकल्प आेव्हरफ्लाे हाेऊन सांडवा वाहू लागेल. त्यामुळे पालिकेने बिंदुसरा नदीपात्रालगत व पूररेषेच्या आत येणाऱ्या लाेकांना नोटिसा बजावून सतर्कतेचा इशारा दिला असून २२५ कुटुंबांनी आपापली घरं बंद करून स्थलांतरित झालेत. संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी व आपत्कालीन सुरक्षेसाठी पालिकेचे आराेग्य व अग्निशमन विभागांतर्गत १२ जवानांचे पथक बचाव साहित्यासह तयार झाले आहे.