आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो:प्रकल्पाचे आनंद लुटण्यासाठी निसर्गप्रेमींनी केली तोबा गर्दी;  प्रकल्प परिसरात सुरक्षितेसाठी पोलीस बंदोबस्ताची गरज

बीड17 दिवसांपूर्वीलेखक: रवी उबाळे
  • कॉपी लिंक
आमेर हुसेन    

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा प्रकल्प सोमवारी ओव्हरफ्लो झाले आहे. बीड तालुक्यामधून जाणाऱ्या बिंदुसरा नदी परीक्षेत्रांमध्ये बीड शहरा लगतच बिंदुसरा मध्यम प्रकल्प आहे. मागील तीन दिवसापासून बिंदुसरा प्रकल्पाच्या वरील परी क्षेत्रांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. सोमवारी पहाटेपासून हा बिंदुसरा प्रकल्प भरला असून या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी धो धो वाहू लागले आहे.

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण हे यंदाच्या पावसाळ्यामध्ये लवकरच भरलेले आहे. या प्रकल्पाला दोन प्रकारच्या मोठ्या भिंती (चादरी) आहेत. एकाला सांडव्याची चादर म्हणतात तर दुसऱ्या चादरीस मोठी भिंत असे संबोधले जाते. सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प शंभर टक्के भरला असून या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी धो धो वाहू लागलेले आहे. हा प्रकल्प ओवरफ्लो होत असल्याची माहिती परिसरासह बीड शहरातील नागरिकांना समजताच निसर्गप्रेमी नागरीकांनी प्रकल्प होताना पाहण्यासाठी सकाळपासूनच प्रकल्पावर गर्दी केलेली आहे.

तसेच या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरणात गरम गरम पदार्थांचे स्टॉल आणि हातगाडी उपलब्ध झालेले आहेत. बिंदुसरा प्रकल्पाच्या जवळच खवय्येगिरी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान बिंदुसरा प्रकल्प परिसरात तरुणांची मोठी गर्दी उसळू लागली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त नियुक्त करावा अशी मागणी याठिकाणी येत असणाऱ्या नागरिकांकडून होऊ लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...