आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव:परळी तालुक्यातील रामेवाडी येथील 500 कोंबड्या 'बर्ड फ्ल्यू'मुळे नष्ट

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी तालुक्यात बर्ड फ्ल्युचा शिरकाव झाला असून रामेवाडी येथील पाचशे कोंबड्या नष्ट केल्या आहेत. जिल्हाधिकारी जगताप यांनी तीन गावात संक्रमित क्षेत्र तर तेरा गावात खबरदारीचा उपाय म्हणुन सतर्क क्षेत्र घोषित केले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात बर्ड फ्ल्युची लागन वाढत आहे. या रोगापासून परळी तालुका अद्याप दूर होता. परंतु, रामेवाडी येथील तुकाराम कुकडे यांच्या शेडमधील काही कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्ल्युची लागन झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर जिल्हाधिकारी आर.एस.जगताप यांनी रामेवाडीपासून एक किलोमीटर परिसरातील रामेवाडी तांडा, जळगव्हाण शिवारात प्राण्यातील संक्रमक व नैसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत संक्रमित क्षेत्र घोषित केले. तर पोहनेर, डिग्रस, रामनगर तांडा, हिवरा, गोवर्धन, हिवरा वस्ती, पिंपरी, तेलसमुख, बोरखेड, ममदापुर, कौडगाव हुडा, कौडगाव हुडा तांडा व माजलगाव तालुक्यातील कोथाळा आदी गावांना सतर्क क्षेत्र घोषित करत या गावातील कुकुटपक्षांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे.

जळगव्हाण येथील 500 कोंबड्या नष्ट

परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील कुकुटपालक तुकाराम कुकडे यांच्याकडे असलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्युची लागन झाल्याने त्यांच्याकडील 500 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. परळी तालुक्यात बर्ड फ्ल्युची लागन सुरू झाल्याने कुकुटपालकांवर संकट उभे राहिले आहे.