आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील आर्वी येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देण्यात आला. मानवता हाच खरा धर्म यांची शिकवण देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे अविरत प्रवाहीत राहावा या उद्देशाने आर्वी येथील तरुणांनी एकत्र येऊन प्रथमच संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिपक नागरगोजे, सरपंच शहाजी भोसले, घमाजी वाघमारे, राम गायकवाड, संजय भिंगले, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन सखाराम भिंगले, अरुण भोसले, माजी सरपंच रामभाऊ देवकते, लक्ष्मण जोगदंड, चांद साहेब बागवान, अशोक भोकरे, गोपाल भुसारे, मयुर भोसले, दत्तात्रय पवळ, बन्सीधर कदम, पोलीस पाटील मधुकर भोसले, शिवाजी भोकरे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या उत्सवासाठी अशोक नन्नवरे, गणेश नन्नवरे, सखाराम नन्नवरे, दिपक नन्नवरे, कृष्णा नन्नवरे व नन्नवरे परिसराकडून परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.