आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील टाकरवण परीसरात आतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारखाना मुकादम वाहन मालकांना तोडणी, वाहतुकीचे कमिशन देत असूनही दलाल टोळी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन उसाच्या पैशात दलाली करून रोज लाखो रुपये कमवत आहेत. दलाल दलाली पैसा कमवत आहेत. अतिरिक्त उसाचे नियोजन करखान्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अपयशी ठरत आसल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. स्थानिकचे साखर कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी इतर जिल्हात ऊस घालन्यासाठी मोठी कसरत करावी लागत अाहे. इतर जिल्हात ऊस घालन्यासाठी परीसरात काही दलाल मुकादम वाहन मालकांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. इतर जिल्हातील साखर कारखान्याने ऊसाला दर कितीही देऊन ही दलाल टोळी शेतकऱ्यांचा ऊस १५०० ते १७०० रुपये भावानेच खरेदी करत आहेत.
निम्मा गळीत हंगाम ऊरकला आसला तरी माजलगाव गेवराई व टाकरवन परीसरातील निम्माही ऊस गेलेला नाही. आजही निम्या प्रमानात ऊस शेतात वाळत आहे.मात्र स्थानीक कारखान्याची टोळी येत नसल्याची वाट पाहून शेतकरी हाताश झाला आहे.परिणामी इतर जिल्हातील कारखान्याच्या दलाला बे भावाने ऊस देत आहेत. इतर जिल्हातिल कारखान्याचा जो ऊसाचा दर आहे तो शेतकऱ्यांला मिळने गरजेचे आहे. मात्र टोळी मुकादम वाहन मालक त्या पैशात दलाली करत आहे. निम्मेच पैसे शेतकऱ्याला देत आहेत. दलालाच्या लुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होत आहे. रात्रन दिवस मेहनत व पाणी घालुनही ऊसाला मुल्य मिळत नाही शेतकऱ्याचे आर्थीक नुकसान होत आहे.
उसाच्या आडून मोठे राजकारण...
ऊस घालण्यासाठी जिल्हात नविन स्कीम लागु झाली आहे. ऊस घालायचा आसेल तर पक्षात प्रवेश करा आसी ही स्कीम आहे. ऊसाच्या आडुन मोठ राजकारन होत आहे ऊस घालन्यासाठी पक्ष प्रवेशाचा प्रोग्राम सुरु झाले आहेत.ऊस घालन्यासाठी शेतकरी काहीही करत आहेत. बिल कधी येईल याचा तर विचार ही केला जात नाही. मात्र ऊस घालन्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवेश करनाराचाच ऊस जाणार आसेल तर सर्व सामान्या शेतकऱ्यांच काय आसा प्रश्न निर्मान झाला आहे.
शेतकऱ्यांची होणारी लुट थांबण्यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लाऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा.शेतकऱ्यांची होणारी लुट व ऊसाचा प्रश्न मार्गी न लागल्यास तिव्र आंदोलन करु, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशध्यक्षा पुजाताई मोरे यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.