आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:धारूर बाजार समितीवर भाजपचे स्पष्ट बहुमत, 18 पैकी 17जागांवर विजय

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा भाजप गटाच्या ताब्यात आल्या आहेत. तर केवळ एका जागेवर राष्ट्रवादीच्या गटाला समाधान मानावे लागले.

धारूर बाजार समितीची निवडणुकीत दोन पॅनल रिंगणात हाेते. शुक्रवारी सकाळी मतमोजणी झाली त्यात १८ पैकी १७ जागांवर भाजपच्या गटाचे उमेदवार निवडून अाले एका जागेवर राष्ट्रवादीच्या गटाचा उमेदवार विजयी झाला. भाजपच्या गटाचे स्पष्ट बहुमत आल्यामुळे धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

१८ जागांत सेवा सहकारी सोसायटी मधून ११ पैकी ११ जागा, ग्रामपंचायत मतदार संघातील ४ पैकी ४ ही जागा भाजप गटाने जिंकल्या. व्यापारी मतदारसंघातून दोन पैकी एक जागाही भाजपने मिळवल्या. हमाल मापाडी मतदार संघातील असलेल्या एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाला. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील ११ पैकी एक जागा बिनविरोध आली होती. धारूर बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपचे रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. प्रकाश सोळंके, जयसिंह सोळंके यांनी प्रतिष्ठा पणास लावली. सकाळी साडे आठ वाजता बाजार समिती यार्डात मतमोजणी सुरू झाली. अवघ्या दोन तासांत निकाल जाहीर झाले. निकालानंतर कार्यकर्ते, उमेदवारांनी गुलाल उधळून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...