आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:शहरातील असुविधांचा वाचला पाढा, तात्काळ कार्यवाही करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील ईदगाह रोड, नाळवंडी नाका, किशोरी जिनिंगपर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामास तात्काळ मंजुरी द्यावी, अन्य मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्यांचेही काम तातडीने करावे यासह इतर मूलभूत सुविधांसंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली.

विविध मूलभूत सुविधांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिष्टमंडळाने मांडले. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून कामे करण्याचे आदेश दिले, अशी माहिती भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी दिली.

शहरातील असुविधांकडे वेधले लक्ष

बीड शहरातील इदगाह रोड -नाळवंडी नाका - किशोरी जिंनीग सिंमेट रस्ता तात्काळ प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळवून लवकर त्याचे काम सुरू करावे , शहरातील शासनाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेल्या मात्र अद्याप सुरू नसलेल्या सिंमेट रस्ताचेही काम तातडीने सुरू करावे, भगवान बाबा प्रतिष्ठानच्या बाजूच्या बिंदुसरा नदी जवळील स्मशानभूमीमधील घाणीचे पाणी व कचरा याचे निराकरण होणे आवश्यक आहे. बीड शहरातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट चालू करणे व दररोज नाल्यांची सफाई करणे, नगररोडवरील तिन्ही सार्वजनिक शौचालय - स्वच्छतागृहांची दैनंदिन साफ-सफाई करावी, यासह अनेक मूलभूत नागरी असुविधांबाबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व बीड शहरातील नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक उमेश ढाकणे यांना निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी शिष्टमंडळाच्या मागणीची दखल घेत मुख्याधिकारी ढाकणे यांना प्रत्यक्ष पाहणी करून कामे सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी बीड जिल्हा भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्यासह जिल्हा सरचिटणीस देविदास नागरगोजे, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, शहराध्यक्ष भगिरथ बियाणी, भटके -विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव, संगीताताई धसे, अनिल चांदणे, विलास बामणे, गणेश पुजारी, सुनील मिसाळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...