आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पक्ष हा एक विचार आहे. काँग्रेस न संपणारा पक्ष आहे, भले-भले संपले पण काँग्रेस संपली नाही, असे सांगत भाजपकडून जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात जनता आता काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बदल दिसून आला आहे.
काँग्रेसने विकासाचे राजकारण केलं असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. शहरातील बालेपीर भागात ‘ हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. या वेळी ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला गणेश बजगुडे, परवेज कुरेशी, नारायण होके, मालोजी गलांडे, दत्ता भाऊ गलांडे, अशोक देशमुख, जाधव सर, बहादूरभाई, अफरोज तांबोळी सय्यद फरहान, शेख मोहसीन, कदर बाबा, हनुमान घोडके, अमजद कुरेशी, कर्मा चाऊस यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.
देशमुख म्हणाले, सध्याचं भाजपचे सरकार भांडवलधार्जीने आहे. गांधींचे विचार रुजवणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांचे सरकार आणण्यासाठी राहुल गांधी यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. नुकतेच विधान परिषदेच्या निवडणुकीत महाआघाडीच्या बाजुने जनतेने कौल दिला आहे. येत्या काळात देशातील जनता नक्कीच राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असं सांगत काँग्रेस हा एक विचार आहे, आजपर्यंत काँग्रेसने जे काही केलं आहे ते जनतेचं हित डोळ्यांसमोर ठेवून काम केलं आहे. भले भले संपले पण काँग्रेस पक्ष संपला नाही, भाजपकडून जातीपातीचे राजकारण करून समाज विभागण्याचे काम केलं जाऊ लागलं. येत्या कार्यकाळात काँग्रेसच देशाचे नेतृत्व करील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.