आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायकराव मेटे:भाजपने स्व. विनायकराव मेटे यांना दिलेला शब्द पाळावा : उदयकुमार आहेर

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामचे नेतृत्व त्यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी करावे, अशी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखी मागणी केली असून भाजप मित्रपक्षाने डॉ.ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त यादीतून विधान परिषदेची आमदारकी देऊन येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री करावे, असा ठराव शिवसंग्राम युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखाने संमत करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर हे होते. महाराष्ट्र प्रदेश शिवसंग्राम युवक आघाडीची बैठक आज घेण्यात आली. स्व.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम युवक आघाडीची पुढील भविष्यातील कार्यक्रम व राजकीय भूमिका याविषयी चर्चा करण्यात आली. स्व.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम वाढविण्याची महत्वाची जबाबदारी युवक आघाडीवर आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केले. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करीत डॉ.ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामचे नेतृत्व हाती घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...