आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:भाजपच्या वतीने हिंगोलीत महाविकास आघाडीच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन, ओबीसींचे राजकिय आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या निष्क्रीय धोरणामुळेच ओबीसींचे राजकिय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत भाजपने आज हिंगोलीत बोंबाबोंब आंदोलन केले. त्यांनी हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हे आंदोलन आयोजित केले होते. दरम्यान, भाजप आमदार तानाजी मुटकुळेसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते.

राज्य सरकारच्या निष्क्रीय धोरणामुळेच राज्यात ओबीसींचे राजकिय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राजकारणातून ओबीसींना संपविण्याचा डाव असल्याचा त्यात सांगण्यात आले. मात्र भाजपा ओबीसींच्या पाठीशी असून राज्य शासनाने या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा रस्तयावर उतरण्याचा इशारा आमदार मुटकुळे, माजी आमदार वडकुते यांनी यावेळी दिला.

यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, पप्पू चव्हाण, महिला आघाडीच्या यशोदा कोरडे, रजनी पाटील, बाबा घुगे, संतोष टेकाळे, संजय ढोके, नगरसेवक बिरजू यादव, उमेश गुठ्ठे, ॲड. अमोल जाधव, ॲड. के. के. शिंदे, बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, बाळासाहेब नाईक, आशिष वाजपेयी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...