आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात अतिवृष्टी:संतापलेल्या पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा; म्हणाल्या - अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्त्याच्या कडेला नव्हे, बांधावर जाऊन पाहणी करावी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. तर दुसरीकडे, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, संपूर्ण जिल्हा अतिवृष्टीग्रस्त असताना पालकमंत्री मात्र पुण्याला आहे. केंद्र सरकारकडून मदत येईलच तो विषय वेगळा आहे. परंतु, राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करुन आपली भूमिका बजावावी.

रस्त्याच्या कडेला नव्हे, बांधावर जाऊन पाहणी करावी
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील परिस्थिती खूपच गंभीर आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत बळीराजाला आधार द्यायला हवा. परंतु, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे रस्त्याच्या कडेने पाहणी करत असा टोला पंकजा मुडेंनी यावेळी लगावला.

अतिवृष्टीसाठी तात्काळ पॅकेज जाहीर करा
आज बीड जिल्हाच काय पण मराठवाडा अधांतरी आहे. अतिवृष्टीसाठी तात्काळ पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. हे पॅकेज केवळ पिकांसाठी नाही तर वाहून गेलेल्या जमिनीसाठी, मालमत्तेच्या नुकसानासाठी, वाहून गेलेल्या गुरांढोरांसाठीही द्यावे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अन्नधान्य भिजून गेले, अशा शेतकऱ्यांना खाण्यासाठी पंचायत होणार आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पॅकेज जाहीर करावे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...