आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांना कोरोना:भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोना; कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने संक्रमित झाल्याची व्यक्त केली शक्यता

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समाज माध्यमावरुन दिली माहिती

भाजप महासचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाबाधित झाल्या आहेत. समाज माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती देत संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घण्याचे आवाहन केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच परळीत दौरा केला होता. यावेळी त्यांनी आपले कोरोनामुळे निधन झालेल्या अंगरक्षकाच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले होते तर इतरही काही कुटुंबांची भेट घेतली होती.

दरम्यान या दौ-यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणॆ जाणवू लागल्याने त्या आयसोलेट झाल्या. त्यानंतर कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब दिला होता. गुरूवारी सकाळी त्यांनी आपण कोरोनाबाधित झाल्याचे समजताच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली असून दौ-यादरम्यान संपर्कातील सर्वाना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...