आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताबा:भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे; गिरवली सोसायटी पंकजा मुंडेंच्या ताब्यात

परळी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने तालुक्यातील गिरवली सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या पॅनलला धुळ चारत पॅनलने सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. गिरवली सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती परंतू नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानंतर या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या

नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवारांत काशिराम आपेट, प्रतापराव आपेट, लक्ष्मण आपेट, सुधीर आपेट, संतोष आपेट, बाबु गिरवलकर, विजयकुमार गिरवलकर, राजकुमार बावणे, रंगनाथ जोगदंड, मिनाक्षीबाई आपेट, मिनाक्षीबाई निसाले, महादेव पाटणकर, हनुमंत खामकर यांचा समावेश आहे. पॅनलचे प्रमुख प्रतापराव आपेट आणि सर्व विजयी उमेदवारांचे मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...