आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये मांजरीला दुध पाजले, मांजरीच्या गळ्यात चिवसेना असा फलक लावला

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर अडचणीत सापडले आहेत नारायण राणे

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवार 24 ऑगस्ट 2021 रोजी अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये भाजप व नारायण राणे समर्थक रस्त्यावर उतरले. बीड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांनी चक्क मांजरीच्या गळ्यात चिवसेना असा फलक लावुन मांजरीला दुध पाजत शिवसेनेचा निषेध केला.

बीड येथील भाजपचे कार्यकर्ते व स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजपच्या अॅड संगीता धसे यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राणे साहेब अंगार है बाकी सब भंगार है, या आघाडी सरकारचे करायचे काय, भाजपचा विजय असो, डॉ.प्रितम मुंडे आगे बढो अशा घोषणा दिल्या.

आंदोलनाच्या शेवटी आंदोलकांनी बरोबर आणलेल्या एका मांजरीच्या गळ्यात चिवसेना असा फलक लावुन मांजरीला दुध पाजत शिवसेनेचा निषेध केला. यावेळी आंदोलनात सुहास विद्यागर, नितीन ढिसले, विक्की वाव्हळ, विशाल गायकवाड, योगेश जाधव आदी राणे समर्थक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...