आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न:संस्थांचा गैरवापर करीत लोकशाही अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न

केज24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगासारख्या यंत्रणांना वेठीस धरून स्वायत्त संस्थांचा गैरवापर करीत महाराष्ट्राचे राजकारण व संसदेची लोकशाही अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केज येथील पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे या केज येथील आढावा बैठकीसाठी मंगळवारी आल्या होत्या. जिल्हा संपर्कप्रमुख धिंडू पाटील, जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अंधारे म्हणाल्या की, ज्या तथाकथित शक्तींवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या तथाकथित शक्तीचे देशाचे गृहमंत्री अमित शहा काल महाराष्ट्राचा दौरा करून गेले.

शहा हे राज्यातील पीक परिस्थितीवर बोलतील, असे वाटले होते. मात्र हेक्टर आणि एकर या मधला फरक न कळणाऱ्या कृषिमंत्र्यांकडून अहवाल काय मिळाला असणार? असा टोला त्यांनी लगावला. नवनीत राणा या मेळघाटातील कुपोषणावर, अमरावतीचे प्रश्न आणि मतदारसंघ वाऱ्यावर सोडून सांप्रदायिक दंगली का उसळतात? यावर बोलत नाहीत. अशा चव सोडून बोलणाऱ्या लोकांना आवर घालतील असे वाटले होते. पण शहा त्यांचा दौरा आणि भाषण हे उद्धव ठाकरे यांच्यावर होते. त्याचा आम्हाला अभिमान आहे. यातच शिवसेनेची ताकद आहे. यावरून येणाऱ्या निवडणुकांत भाजपसमोर शिवसेनेचे आव्हान उभे आहे असे दिसते. शिवसेना व शिवसैनिक हे आमदार, खासदार घडवतात. जिव्हाळा, आपुलकी व आदराचा घटक म्हणून शिवसैनिक आहे. शिवसैनिक हा सेनेसोबत उभा आहे.

बातम्या आणखी आहेत...