आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचे राजकारण तापले:भाजपच्या वाटेवरील क्षीरसागरांवर भाजपच्याच स्थानिक नेत्यांची टीका

बीड / औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेवटच्या क्षणी शिवसेनेत प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, बीड न. प. निवडणुकीत भाजपचेच स्थानिक नेते त्यांच्यावर टीकास्त्र सोडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अजितदादा पवारांनी क्षीरसागरांच्या घराण्यात फूट पाडली. जयदत्त यांचे पुतणे संदीप यांना पाच वर्षांपूर्वी विधानसभेची उमेदवारी देण्याचे ठरवले. त्यामुळे दुखावलेल्या जयदत्त यांंनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीड मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने तुम्ही तिकडे जा, असा सल्ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यानुसार त्यांनी शिवबंधन बांधले. पण विधानसभेत त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांनी नगर परिषदेत लक्ष घातले. आता शिवसेना-भाजप युती नसल्यामुळे बीड मतदारसंघ भाजप लढवण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेऊन जयदत्त क्षीरसागर पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत, असे म्हटले जाते. आता भाजपचे स्थानिक नेते नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यावरच जोरदार हल्ला करत आहेत. क्षीरसागरांनी मनसोक्तपणे बीड नगरपालिकेची सत्ता भोगली. तेव्हा जनतेचे प्रश्न सोडवले नाही. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर विकासाचे डोहाळे लागले आहेत. त्यांच्या भूलथापांना जनतेने थारा देऊ नये, असे आवाहन नवनाथ शिराळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...