आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. माऊलींच्या दृष्टीतच कृपाप्रसाद होता. पर्जन्य आरंभाने तो आजही मिळाला असल्याचे प्रकाश महाराज बोधले यांनी प्रथम पुष्प गुंफताना सांगितले. बीड तालुक्यातील चाकरवाडी येथील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाला नुकतीच सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन झाले. यावेळी बोलताना प्रकाश महाराज म्हणाले, नको ब्रह्मज्ञान,आत्मस्थिती भाव मी भक्त तु देव एैशी करी अशा निर्भय प्रेमळ निरपेक्ष स्थानिक पोहचून अखंड मुखात नामस्मरण भागवत चिंतन हाताने भुकेल्यास अन्नदान देऊन माणसातला माणुस जागा करून सोप्या मार्गाने परमार्थात उंची गाठून देणारे माऊली होते.
त्यांच्या नुसत्या दृष्टीत कृपाप्रसाद देण्याची ताकद होती.त्यांचे आजही वैभव आहे असे विचार अन्नदानाच्या उपासनेतून भक्तांचा हा अपार मेळा जमवला आहे. आपल्या जीवनाला आनंद मुख समाधान देऊन त्यांचा उध्दार माऊलींनी केला. सोप्याचं अवघड करून मागून पांडित्य दर्शविणारे बरेच आहेत.पण अवघड परमार्थ सोपा करून रूजवला तो माऊलींनी म्हणून आजचे हे वैभव आहे असे बोधले म्हणाले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हाती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.