आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बीड येथील एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. मिरगणे म्हणाले, रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय नातेवाईक सैरभैर होतात. थॅलेसेमिया असलेले रुग्ण रक्ताचा तुटवडा निर्माण झाला की त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो.
म्हणून रक्तदान हे महान दान आहे. एचडीएफसी बँकेचे अधिकारी दीपक भंडारे व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे यांनी प्रथम रक्तदान करणाऱ्या अश्विनी मुंडे या विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या शिबिरामध्ये एकूण २१रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी एचडीएफसी बँकेचे प्रवीण कापले, अमोल राऊतमारे, सागर कोकिळ, गणेश रोटे, संतोष गायकवाड, दिलीप औचरमल, उत्तम राऊत यांच्या पथकाने काम केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ अरुण दैतकार, डॉ मनोजकुमार नवसे, डॉ प्रकाश कोंका, कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा राजाभाऊ नागरगोजे यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.