आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षिस वितरण:अमोलक ऋषीजी पुण्यतिथी निमित्त आज रक्तदान शिबिर ; मिरवणुकीचे ही आयाेजन

कडा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ आणि संस्थेच्या सर्व विद्याशाखांच्या वतीने संस्थेचे संस्थापक शास्त्रोध्दारक जैनाचार्य अमोलक ऋषीजी महाराज साब यांच्या ८६ व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी (१३ सप्टेंबर) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ या शतकी महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेचे संस्थापक श्री अमोलक ऋषीजी म. सा. यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १३ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रतिमेची कडा शहरामधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच पुण्यतिथी निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या गांधी महाविद्यालयात नगर येथील आनंद ऋषीजी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथी सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल. संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर यांच्याकडून या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...