आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:गेवराईत गजवक्र मंडळाच्या शिबिरात 50 जणांचे रक्तदान

गेवराई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील माऊली नगर भागातील शिक्षक कॉलनीत शंकर गायकवाड यांच्या मार्गदर्शखाली बसवलेल्या गजवक्र गणेश मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी (दि.४) आयोजित रक्तदान शिबीरात ५० हून अधिक भाविकांनी रक्तदान करुन या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. सामाजिक उपक्रमांच्या आयोजनामुळे सर्व स्तरातून या गणेश मंडळाचे स्वागत होत आहे.

गेवराई शहरातील माऊली नगरमधील शिक्षक कॉलनीत गजवक्र गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शंकर गायकवाड, सुंदर सोनवणे, डॉ. खाडे, सागर पिंपळकर, विशाल गायकवाड आदी आयोजकांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सव काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर यासह विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

बीड शहर व परिसरात पाऊस
बीड | सुमारे वीस दिवसांपासून गायब असलेला पाऊस पुन्हा परतला असून मागील दोन दिवसांत जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. बीड शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मागील वीस दिवसांमध्ये पावसाने मोठा खंड दिला होता. ऐन पिके भरात असताना पाऊस नसल्याने पिके सुकून गेली होती. यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. मात्र, मागील दोन दिवसांत पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...