आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:महेश नवमीदिनी 51 जणांचे रक्तदान; अंबाजोगाईत माहेश्वरी परिवाराच्या वतीने आयोजन

अंबाजोगाई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश नवमीनिमित्त महेश्वरी परिवार अंबाजोगाईने आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले यात १८ महिलांचा समावेश होता. पाच दांपत्यानी सपत्नीक, तर दोन कुटुंबाचे सहकुटुंब रक्तदान केले हे विशेष. महेश नवमी निमित्त झालेल्या रक्तदान कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.डॉ. गोपाल बाहेती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अॅड. संजय लोहिया, युवा अध्यक्ष पवन भराडीया, श्रीकांत बजाज, जगदीश जाजू राहुल मुंदडा, राजेश दरक तसेच माहेश्वरी समाजातील महिला व युवक उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात राहुल मुंदडा ,राजेश दरक, गोविंद मंत्री , शिवराज जाट, किशन साहू , दामोदर भांगडीया , हेमलता मंत्री, सागर भुतडा , श्रीकांत भुतडा, धनंजय रांदड , मयुरी मुंदडा, पुनम मुंदडा, शीतल मुंदडा, सौरभ जाजू, संकेत तापडिया, सुशील रांदड, सत्यनारायण भन्साळी, सुनील मुंदडा, गौरी रांदड, पुनम रांदड, जयश्री मालपाणी, जया सारडा, आरती मालपाणी, अंकिता बियाणी,योगिता लोहिया, अक्षय रांदड यांनी रक्तदान केले.

१८ महिलांचेही रक्तदानात योगदान, पाच दांपत्य तर दोन पूर्ण कुटुंबांकडूनही सहभाग
रक्त संकलनाचे काम स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या डॉक्टर रमेश तोंडे, डी. एस.कांबळे, आबे मिर्झा, शेख बाबा व शशिकांत पारखे यांनी पाहिले.प्रमुख अतिथींच्या हस्ते रक्तपेढी कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...