आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:पल्स हॉस्पीटलमध्ये हाडाची ठिसुळता; वडवणीत उद्या मोफत हाड तपासणी शिबिर

वडवणी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पल्स हॉस्पीटलमध्ये हाडाची ठिसुळता (ऑस्टिओपोरोसीस) मोफत तपासणी शिबिर शनिवारी (१८ जून) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सत्यप्रेम चोले यांनी केले आहे. या शिबिराबाबत हॉस्पिटलच्या वतीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हाडाची ठिसुळता ही वयाच्या चाळीशीनंतर स्त्री व पुरुष या दोघांमध्ये आढळते.

हाडाची ठिसुळता म्हणजे हाडांतील कॅल्शिअम कमी होऊन हाडे ठिसूळ व कमकुवत बनतात आणि यामुळे पुढे वरचेवर फ्रॅक्चर व सांधेदुखीचे वयाबरोबर वाढलेले प्रमाण वाढते. स्त्रीयांना रजोनिवृत्तीनंतर वाढत्या वयाबरोबर हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण ३० ते ४० टक्केपर्यंत कमी झालेले आढळते. याच पार्श्वभूमीवर पल्स हॉस्पिटलच्या वतीने मोफत हाडांची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या मोफत शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...