आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मैंदा सोसायटीवर हाडे, पवार बिनविरोध; माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे मैंदा सोसायटीवर वर्चस्व

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मैंदा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजाभाऊ हाडे, तर व्हाइस चेअरमनपदी राजाभाऊ पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून ही सोसायटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आली आहे.

मैंदा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमन व व्हाइस चेअरमन यांच्या निवडीसुद्धा बिनविरोध झाल्या आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा प्रमुख अनिल जगताप, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, गंगाधर घुमरे, अरूण डाके यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमनवपदी राजाभाऊ हाडे तर व्हाइस चेअरमनपदी राजाभाऊ पवार यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचा डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अ‍ॅड. राजेंद्र राऊत, हामेद चाऊस, सरपंच अशोक घुमरे, अंबादास पवार, अशोक घुमरे, राजाभाऊ घुमरे, नवनिर्वाचित संचालक सर्वश्री महारूद्र घुमरे, संजय काळम, केशव कसबे, आसाराम चव्हाण, गुलाब राठोड, पठाण इब्राहीम, अशोक घुमरे, वसंत घुमरे, बाळनाथ शिंदे, उर्मिला अशोक घुमरे, विमलबाई रघुनाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...