आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या उपक्रमास सुरूवात:पुतळा तिथे पुस्तक लेटस् रिडचा उपक्रम‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लेट्सरीड इंडिया या सामाजिक‎ संस्थेच्या वतीने आज मंगळवार ३‎ जानेवारी रोजी क्रांती ज्योती‎ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या‎ निमित्ताने ‘पुतळा तिथे पुस्तक’ या‎ नव्या उपक्रमास सुरूवात होत आहे.‎ बीड शहरातील सिध्दीविनायक‎ कॉम्पलेक्स भागातील क्रांती ज्योती‎ सावित्रीबाई फुले यांच्या‎ पुतळ्याजवळ फुले यांच्या‎ जीवनावर अधारित पुस्तकांचा संच‎ व इतर काही पुस्तके एका पेटीत‎ ठेवण्यात येत आहेत.

बीड नगर‎ पालिकेच्या मुख्याधिकारी नीता‎ अंधारे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या‎ जयंतीदिनी आज सकाळी नऊ‎ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन होत‎ आहे. ज्या कोणाला हे पुस्तक‎ वाचायचे असेल त्यांना मोफत याचा‎ लाभ घेता येईल. बीडमध्ये हा‎ पहिलाच उपक्रम असून जास्तीत‎ जास्त वाचकांनी याचा लाभ घ्यावा,‎ असे आवाहन अर्चनाताई सानप,‎ डॉ. गणेश ढवळे, विजय गिते‎ पाटील, बालाजी मारगुडे व लेट्स‎ रीड टीम यांनी केले आहे.‎ पेटी उघडून पुस्तक घ्यावे व‎ रजिस्टर मध्ये नाव, नं. पुस्तकाच्या‎ नावाची नोंदणी करावी.‎

बातम्या आणखी आहेत...