आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:तायक्वांदो स्पर्धेत बोरगावच्या विद्यार्थ्यांनी पटकावली 7 पदके

केज23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी “बीड जिल्हा तायक्वांदो स्पर्धा २०२२” या स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदके पटकाविले. याबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार करण्यात आला. बीड जिल्हा तायक्वांदो स्पर्धा २०२२” या स्पर्धेत बोरगाव ( बु. ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वरा लक्ष्मण वळेकर, अमोद दत्तात्रय गव्हाणे व दुर्गा दत्तात्रय गव्हाणे या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक, स्पंदन निशांत गव्हाणे, जिगर महादेव गव्हाणे या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक तर शंतनु प्रवीण वळेकर, संस्कृती विजय गव्हाणे या विद्यार्थ्यांनी कांस्य पदके पटकावली.

त्यांना प्रशिक्षक बन्सी राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी देशमुख हे होते. तर ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक निंगुळे, उपसरपंच दिगंबर गव्हाणे, मधुकर फाटक, उदयसिंह शिंदे, गजानन गव्हाणे, सतीश गाते, अमोल गव्हाणे, अजय गव्हाणे, माजी शिक्षक शुक्राचार्य गव्हाणे, दादासाहेब गव्हाणे, लक्ष्मण वळेकर, अंगद फाटक, विजय गव्हाणे, महादेव गव्हाणे, लक्ष्मण गव्हाणे, बालासाहेब वळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदक विजेत्यांना शाल, फेटा, पुष्पहार व श्रीफळ देऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. तर प्रशिक्षक बन्सी राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण वळेकर यांनी विद्यार्थी जीवनामध्ये खेळ खूप महत्त्वाचा आहे. आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे खूप गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. तर शिवाजी देशमुख यांनी अभ्यासाबरोबर खेळाचे महत्त्व सांगितले. नियमित सराव करून मेहनत केल्यास यश मिळविता येऊ शकते, असे प्रशिक्षक बन्सी राऊत यांनी सांगितले. सूत्रसंचलन सहशिक्षक शंकर तारळकर यांनी तर आभार गिरी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक सतीश देशमुख, आर. के. देशमुख, श्री. पठाण, श्रीमती देखणे यांच्यासह पालक उपस्थित होते.

पालकांनी मुलांना पाठबळ दिल्याने हे यश शक्य
पालकांनी आपल्या पाल्यांमधील गुण ओळखून त्याला स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धेमध्ये मुलांना सहभागी करणे गरजेचे आहे. आमच्या छोट्याशा गावातून विद्यार्थ्यांनी मेहनतीने सात पदके मिळवल्याने अतिशय कौतुक वाटते आहे.'
दत्तात्रय गव्हाणे, ग्रामस्थ, बोरगाव (बु.), ता. केज

बातम्या आणखी आहेत...