आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासासऱ्याच्या नावे असलेले वीज मीटर जळाल्याने ते मीटर बदलून नवे मीटर बसवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या परळी वीज वितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल नागरगोजे यांच्यासह खासगी व्यक्ती वृक्षराज लक्ष्मण काळे या दोघांना शुक्रवारी परळीत रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महावितरणच्या परळी कार्यालयात शहर पथकात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून विशाल नागरगोजे हे कार्यरत आहेत. एका वीज ग्राहकास सासऱ्याच्या नावावरील मीटर जळाल्याने ते बदलून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, ग्राहकाने शुक्रवारी (६ जानेवारी) बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल धस, पोलिस निरीक्षक रवींद्र परदेशी, पोलिस अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी, श्रीराम गिराम, चालक गणेश म्हेत्रे यांनी परळी महावितरण कार्यालयात शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सापळा लावला होता. दरम्यान, वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल नागरगोजे यांनी एका खासगी व्यक्तीमार्फत २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी विशाल नागरगोजे यांच्यासह लाच स्वीकारणारा खासगी व्यक्ती वृक्षराज लक्ष्मण काळे या दोघांविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.