आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्यपदक‎:स्वाराती महाविद्यालयाच्या‎ सूरज देशमुखला कांस्यपदक‎

अंबाजोगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई‎ येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी‎ रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या सुरज मोहनराव देशमुख या खेळाडूने शिव छत्रपती क्रीडा‎ संकुल बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या‎ महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो‎ वजनी गटात कांस्यपदक पटकावले.‎ स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयांतील ‎क्रिडाविभागाचे संचालक डॉ. प्रविण भोसले‎ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज देशमुख याने‎ सराव केला होता.

पुणे येथे संपन्न झालेल्या‎ महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो‎ वजनी गटात कांस्यपदक पटकावले. या गटात‎ २५ खेळाडू सहभागी झाले होते. सुरज देशमुख ‎ ‎ याने यापूर्वीही स्पर्धेत देखील पदकाची कमाई‎ केली होती. त्याच्या यशाबद्दल योगेश्वरी शिक्षण‎ संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे, उपाध्यक्ष‎ अॅड.शिवाजीराव कऱ्हाड, सचिव गणपत व्यास‎ गुरुजी, कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे,‎ कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर व‎ कार्यकारिणीच्या सभासदांनी तसेच‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.थारकर,‎ उपप्राचार्य डॉ.रमेश सोनटक्के, क्रीडा‎ विभागातील प्रा.राजाभाऊ देशपांडे, पदव्युत्तर‎ विभागाच्या संचालिका डॉ.शैलजा बरुरे,‎ गुणवत्ता हमी मंडळाचे प्रमुख डॉ.धनाजी आर्य ,‎ इतिहास विभाग प्रमुख प्रा.महेंद्र देशपांडे, उर्दू‎ विभाग प्रमुख डॉ.एस.ए. रऊफ, राज्य शास्त्र‎ विभाग प्रमुख प्रा.रमेश सोनवळकर ,‎ महाविद्यालयाचे अधीक्षक एस.के रामदासी‎ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुरज देशमुख‎ याचे अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...